रत्नागिरी डाक विभागाकडून ‘भू’ पोस्ट ऑफिससाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यास निविदा; १६ नोव्हेंबर अंतिम मुदत

0
7
रत्नागिरी डाक विभागाकडून ‘भू’ पोस्ट ऑफिससाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यास निविदा; १६ नोव्हेंबर अंतिम मुदत
रत्नागिरी डाक विभागाकडून ‘भू’ पोस्ट ऑफिससाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यास निविदा; १६ नोव्हेंबर अंतिम मुदत

रत्नागिरी डाक विभागाकडून ‘भू’ पोस्ट ऑफिससाठी जागा भाडेतत्त्वावर देण्यास निविदा; १६ नोव्हेंबर अंतिम मुदत

रत्नागिरी :
भारतीय डाक विभागाच्या अखत्यारीतील ‘भू’ पोस्ट ऑफिसच्या कामकाजासाठी भाडेतत्त्वावर इमारत उपलब्ध करून घेण्यात येणार आहे. यासाठी रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक डाकघर कार्यालयामार्फत इच्छुक जागामालकांकडून सीलबंद निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १६ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत आहे.
यासंदर्भातील माहिती रत्नागिरी विभागाच्या डाक अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. इच्छुक जागामालकांनी लेखी अर्जासोबत इमारतीचा ढोबळ नकाशा, चटई क्षेत्रफळ (चौरस फूट), अपेक्षित भाडे, इमारतीचा असेसमेंट उतारा आणि इमारत उपलब्ध होण्याची तारीख नमूद करणे आवश्यक आहे. हा अर्ज सीलबंद लिफाफ्यात सादर करून त्यावर ‘भू पोस्ट ऑफिसकरिता इमारत भाडेतत्त्वावर देण्याबाबत’ असा स्पष्ट उल्लेख करावा.
पोस्ट ऑफिससाठी प्रस्तावित इमारत ग्राहकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी आणि तळमजल्यावर असणे आवश्यक आहे. उघडा व्हरांडा व मोकळी जागा वगळून इमारतीचे किमान क्षेत्रफळ ४१० चौरस फूट असावे. तसेच स्वतंत्र पाणीपुरवठा, स्वतंत्र वीज मीटर, वीज-पंख्यांची सुविधा, वॉश बेसिन, जनरेटरसाठी थ्री-फेज वीजजोडणी आणि शेड असणे आवश्यक आहे.
डाक कर्मचाऱ्यांसाठी इमारतीत किंवा इमारतीला लागून नळपाण्याची सुविधा असलेले स्वतंत्र वैयक्तिक शौचालय असणेही बंधनकारक आहे. निविदा मंजूर झाल्यास जागामालकाला स्वतःच्या खर्चाने डाक विभागाच्या नियमानुसार पाच वर्षांचा नोंदणीकृत भाडेकरार करून द्यावा लागेल. इमारत व्यावसायिक संकुलात असल्यास नियमानुसार जीएसटी लागू राहील.
निविदा सादर करण्याचा तपशील
– अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी – ४१५६१२.
– अंतिम मुदत: १६ नोव्हेंबर २०२६, दुपारी २ वाजेपर्यंत.
– निविदा उघडण्याची वेळ: १६ नोव्हेंबर २०२६, दुपारी ३.३० वाजता, उपस्थित राहू इच्छिणाऱ्या निविदाकारांसमक्ष.
कोणतीही किंवा सर्व निविदा कारण न देता नाकारण्याचा अधिकार डाकघर अधीक्षकांनी राखून ठेवला आहे. त्यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here