प्रजासत्ताक दिन २०२७ : अखिल भारतीय नौसैनिक स्पर्धेच्या निवड शिबिरासाठी रत्नागिरीत सागरी मोहीम सुरू

0
8
खिल भारतीय नौसैनिक स्पर्धेच्या निवड शिबिरासाठी रत्नागिरीत सागरी मोहीम सुरू
खिल भारतीय नौसैनिक स्पर्धेच्या निवड शिबिरासाठी रत्नागिरीत सागरी मोहीम सुरू

प्रजासत्ताक दिन २०२७ : अखिल भारतीय नौसैनिक स्पर्धेच्या निवड शिबिरासाठी रत्नागिरीत सागरी मोहीम सुरू

रत्नागिरी :
प्रजासत्ताक दिन २०२७ निमित्त नवी दिल्ली येथे आयोजित होणाऱ्या अखिल भारतीय नौसैनिक स्पर्धेच्या (All India Nau Sainik Camp) पूर्वतयारीसाठी आणि निवड प्रक्रियेसाठी रत्नागिरीत राष्ट्रीय स्तरावरील नौसैनिक सागरी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी ते पालशेत या सागरी मार्गावर ही मोहीम पार पडणार आहे.
या मोहिमेअंतर्गत ‘कोकण ज्ञान तरंग सागरी मोहीम २०२६’ या उपक्रमाचा शुभारंभ गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता रत्नागिरीतील भगवती जेट्टी येथे करण्यात आला. या मोहिमेतून नौसैनिक स्पर्धेच्या निवड शिबिरासाठी आवश्यक पूर्वतयारी केली जाणार आहे.
एनसीसी ग्रुप मुख्यालय, कोल्हापूरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. पैठणकर, एनसीसी संचालनालय मुंबई (भारतीय नौदल) चे संचालक कॅप्टन जेनिस जॉर्ज आणि २ महाराष्ट्र नवल युनिट एनसीसी, रत्नागिरीचे कॅम्प कमांडंट कमांडर रामानुज दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली या सागरी कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाची माहिती कॅम्प कमांडंट कमांडर रामानुज दीक्षित यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. प्रजासत्ताक दिन २०२७ च्या पार्श्वभूमीवर आयोजित या सागरी मोहिमेला विशेष महत्त्व आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here