ठाण्यात ८ व ९ जानेवारीला ‘बिगेस्ट एमएसएमई एक्सपो’; उद्योगमंत्री उदय सामंत यांना निमंत्रण

0
4

सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना मिळणार व्यासपीठ; उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदारांना एकत्र येण्याची संधी

ठाणे :
ठाणे शहरातील टिपटॉप प्लाझा येथे ८ आणि ९ जानेवारी २०२७ रोजी ‘बिगेस्ट एमएसएमई एक्सपो’चे आयोजन करण्यात येणार आहे. या एक्सपोच्या निमंत्रणासाठी लक्ष्य संस्थेचे संस्थापक अतुल राजोळी आणि ॲडमार्कचे संचालक गणेश दरेकर यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी उद्योगमंत्री सामंत यांना एक्सपोचे निमंत्रण दिले. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अशा उपक्रमांमुळे उद्योजक, व्यावसायिक आणि गुंतवणूकदार यांच्यात संवाद व सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना परस्परांशी जोडणे, व्यवसायवाढीसाठी सहकार्याच्या संधी उपलब्ध करून देणे आणि उद्योगविश्वातील संवादाला चालना देणे, या दृष्टीने या एक्सपोचे आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here