२६/११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मुंबईकरांच्या वतीने महापौर रितू तावडे यांचे अभिवादन

0
5

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या प्रेरणास्थळावर पुष्पचक्र अर्पण; हुतात्म्यांच्या बलिदानाचे केले स्मरण

मुंबई :
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला १८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महापौर रितू तावडे यांनी समस्त मुंबईकरांच्या वतीने या हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना विनम्र अभिवादन केले. स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथील शहीद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांच्या प्रेरणास्थळावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

दहशतवादी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यासाठी तुकाराम ओंबळे यांनी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता बजावलेली भूमिका देशवासीयांच्या स्मरणात सदैव राहील, असे महापौरांनी नमूद केले.
यावेळी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य पत्करलेल्या सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि सुरक्षा जवानांना तसेच या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप मुंबईकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हुतात्म्यांचे अतुलनीय बलिदान आणि मुंबईकरांची जिद्द व एकजूट सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, अशी भावना महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त संतोष साळुंखे तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here