डॉ. अपूर्वा बासूर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू

0
35
डॉ. अपूर्वा बासूर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू
डॉ. अपूर्वा बासूर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू

डॉ. अपूर्वा बासूर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रुजू

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत; जिल्हा परिषद विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनीही केले अभिनंदन

सिंधुदुर्ग :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर यांनी पदभार स्वीकारला. जिल्हा परिषद मुख्यालयात त्यांनी प्रशासकीय कामकाजाची सूत्रे हाती घेतली.
पदभार स्वीकारल्यानंतर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी डॉ. अपूर्वा बासूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील खातेप्रमुख आणि कर्मचाऱ्यांनीही त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
डॉ. अपूर्वा बासूर या २०२२ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IAS अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी वाशिम येथे अतिरिक्त सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी, तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे उपविभागीय अधिकारी आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली.
या विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी प्रशासकीय कामकाजाचा व्यापक अनुभव घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि विविध जिल्हा परिषद योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here