डोंबिवलीत ९,१११ महिलांचे सामूहिक लेझीम वादन नवा विश्वविक्रम प्रस्थापित

0
26
डोंबिवलीत ९,१११ महिलांचे सामूहिक लेझीम वादन नवा विश्वविक्रम प्रस्थापित
डोंबिवलीत ९,१११ महिलांचे सामूहिक लेझीम वादन नवा विश्वविक्रम प्रस्थापित

डोंबिवलीत ९,१११ महिलांचे सामूहिक लेझीम वादन नवा विश्वविक्रम प्रस्थापित

मुंबई l प्रतिनिधी

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीत एक ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील तब्बल ९ हजार १११ महिला आणि विद्यार्थीनींनी एकत्रित लेझीम वादन करत नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे डोंबिवलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी सकाळी श्री संत सावळाराम क्रीडा संकुल येथे हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थीनींसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.

कार्यक्रमादरम्यान ९,१११ महिलांनी सुमारे साडेपाच मिनिटे लेझीमचे विविध प्रात्यक्षिक सादर करत सामूहिक वादन केले. या सादरीकरणामुळे सामूहिक लेझीम वादनाचा नवीन विश्वविक्रम नोंदवला गेला.

यापूर्वी सांगली येथे ७,३३८ महिलांनी सामूहिक लेझीम वादन करून हा विक्रम प्रस्थापित केला होता, अशी माहिती गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी संलग्न अधिकारी स्वप्नील डांगरेकर यांनी दिली. डोंबिवलीतील या उपक्रमाने तो विक्रम मागे टाकत नवा इतिहास घडवला.

विश्वविक्रमाची अधिकृत घोषणा होताच स्वप्नील डांगरेकर यांनी आमदार रविंद्र चव्हाण यांच्या पत्नी सौ. सुहासी रविंद्र चव्हाण यांना वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आणि पदक प्रदान केले. या यशामुळे सहभागी महिला आणि विद्यार्थीनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here