छत्तीसगडमध्ये ८ कोटींच्या अफू शेतीप्रकरणी भाजप नेत्याला अटक

0
20
छत्तीसगडमध्ये ८ कोटींच्या अफू शेतीप्रकरणी भाजप नेत्याला अटक
छत्तीसगडमध्ये ८ कोटींच्या अफू शेतीप्रकरणी भाजप नेत्याला अटक

छत्तीसगडमध्ये ८ कोटींच्या अफू शेतीप्रकरणी भाजप नेत्याला अटक

\

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर अफूची लागवड केल्याप्रकरणी भाजपच्या एका स्थानिक नेत्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत सुमारे ८ कोटी रुपयांच्या अफू शेतीचा भंडाफोड झाला आहे. या प्रकरणामुळे राज्यात राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

या प्रकरणात ५८ वर्षीय भाजप किसान मोर्चाचे समन्वयक विनायक ताम्राकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यासह त्यांचे सहकारी विकास बिश्नोई आणि मनीष ठाकूर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान सामोदा, झेंझरी आणि सिरसा या गावांमध्ये सुमारे पाच एकर जमिनीवर अफूची लागवड केल्याचे उघड झाले.

पोलिसांच्या माहितीनुसार, या शेतीसाठी मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली होती. लागवडीच्या ठिकाणी बाहेरील कामगार ठेवण्यात आले होते, तसेच सुरक्षेसाठी रक्षक आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही व्यवस्था करण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एनडीपीएस कायद्यांतर्गत सुरू असून तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, प्रकरण उघड झाल्यानंतर भाजपने आपली प्रतिमा जपण्यासाठी विनायक ताम्राकर यांना पक्षातून तात्काळ निलंबित केले आहे. तर काँग्रेस नेते भूपेश बघेल यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत यामागे मोठे नेटवर्क असण्याची शक्यता व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here