बुलढाणा जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ सुरू
डॉ. सुधीर ढोणे यांच्या पाठपुराव्यास यश
बुलढाणा l प्रतिनिधी
इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासुन शासकिय वसतिगृह, आधार व स्वयंम या योजना १२ वी नंतरच्या व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत आहे. यावर्षी या योजनेची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ ही दिली होती.
परंतु अनेक अभ्यास क्रमांची प्रवेश प्रक्रीया ३१ डिसेंबर पर्यंत चालल्याने अनेक विद्यार्थी या योजनेपासुन वंचित राहिले होते. विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी या योजनेस मुदतवाढ मिळावी यासाठी बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अप्पर मुख्य सचिव व उपसचिव यांना प्रत्यक्ष भेटुन निवेदन दिले व मुदतवाढीची मागणी केली. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता बहुजन कल्याण विभागाने या योजनेस याआधी दि. ६ ते १५ फेब्रुवारी पर्यंत व आता दि. २५ फेब्रुवारी ते १० मार्च पर्यंत मुदतवाढ दिली आहे. डॉ. सुधीर ढोणे यांच्या पाठपुराव्यास यश आल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये १२ वी नंतर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेश प्रक्रिया ऑनलाईनरित्या राबविण्यात आलेली आहे. मात्र वसतिगृहात निवड यादीनुसार प्रवेश देऊनही अद्याप जागा रिक्त राहिल्याने वसतिगृह प्रवेश, आधार, स्वयंम योजनेसाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती (भटक्या जमाती मधील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना प्रति जिल्हा ६०० या प्रमाणे एकूण २१६०० विद्यार्थ्यांकरीता राबविण्यात येत आहे. व भटक्या जमाती मधील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दिनदयाल उपाध्याय स्वयंम योजना लागु आहे.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाण्ी उच्च शिक्षण घेणार्या
विद्यार्थ्यांना १० महिन्यासाठी भोजन, निवास व निर्वाह भत्ता म्हणुन रू. ६० हजार, इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरीत क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणार्या रू. ५१ हजार, इतर जिल्हयाच्या ठिकाणी तसेच महानगरपालिकेच्या हद्दीपासुन ५ कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालये/शैक्षणिक संस्था या ठिकाणी शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना रू. ४३ हजार, तालुक्यात उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना रू ३८ हजार मिळणार आहेत.
महानगर पालिका हद्दीमधील महाविद्यालयामंध्ये १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणार्या सन २०२५-२६ मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यानी शासन निर्णयान्वये प्रथमतः वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन प्रणालीमध्ये आधार/स्वयंम योजना निवडून अर्ज भरण्याचा प्रयत्न केल्यास आधी तालुका दिसणार नाही. त्यामुळे वसतिगृहाचा अर्ज भरावा. त्यानंतर मंजुर झालेल्या अर्जाचा आरक्षण निहाय गुणवत्तेनुसार शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश दिल्या जाईल. तसेच निवड प्रक्रिया झाल्यानंतर व वसतिगृहातील १०० टक्के जागा भरल्यानंतर उर्वरीत अर्जांचा आधार/स्वयंमयोजनेकरीता आरक्षण निहाय गुणवत्तेनुसार विचार करण्यात येईल.
तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहराच्या ठिकाणी नगरपालिका, नगरपरिषद हद्दीमध्ये कार्यरत महाविद्यालयां मध्ये १२ वी नंतरचे उच्च शिक्षण घेणार्या तसेच २०२५-२६ या शैक्षणिक सत्रामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी जे भाडयाने राहत आहेत अशा इच्छुक विद्यार्थ्यांनी वसतिगृह न निवडता थेट आधार/स्वयंम योजनेकरिता अर्ज भरावा.
पान ४ वर


