तटरक्षक दलासाठी आठ डॉर्नियर-२२८ विमानांची खरेदी

0
63
तटरक्षक दलासाठी आठ डॉर्नियर-२२८ विमानांची खरेदी
तटरक्षक दलासाठी आठ डॉर्नियर-२२८ विमानांची खरेदी

तटरक्षक दलासाठी आठ डॉर्नियर-२२८ विमानांची खरेदी

दिल्ली l प्रतिनिधी

संरक्षण मंत्रालयाने भारतीय तटरक्षक दलासाठी आठ डॉर्नियर-२२८ विमाने तसेच ऑपरेशनल रोल इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी सुमारे २,३१२ कोटी रुपयांचा करार केला आहे. हा करार ‘बाय (इंडियन)’ श्रेणी अंतर्गत करण्यात आला.

हा करार हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट डिव्हिजन, कानपूरसोबत करण्यात आला असून संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

डॉर्नियर-२२८ ही विमाने सागरी गस्त, शोध व बचाव मोहीम, प्रदूषण नियंत्रण आणि सागरी सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या खरेदीमुळे भारतीय तटरक्षक दलाची सागरी देखरेख क्षमता अधिक बळकट होणार असून ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमालाही चालना मिळणार आहे.

ही विमाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून त्यामध्ये प्रगत नेव्हिगेशन प्रणाली, देखरेख उपकरणे आणि सागरी निरीक्षणासाठी आवश्यक साधने बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षमपणे राखणे शक्य होणार आहे.

या करारामुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना मिळणार असून स्थानिक उद्योगांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्वदेशी उत्पादनावर भर देत भारतीय संरक्षण दलांची कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here