थकीत मालमत्ता कर त्वरित भरा; अन्यथा जप्तीची कारवाई
मुंबई l प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांना कडक इशारा दिला असून थकीत कर तात्काळ भरण्याचे आवाहन केले आहे. वारंवार सूचना देऊनही अनेक मालमत्ता धारकांकडून कराची रक्कम प्रलंबित असल्याने आता जप्ती पथक थेट संबंधितांच्या दारी जाऊन कारवाई करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध विभागांत विशेष वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकीदारांना अंतिम नोटिसा बजावण्यात येत असून त्यानंतरही कर न भरल्यास संबंधित मालमत्तांवर जप्तीची कारवाई तसेच इतर कायदेशीर कारवाई आणि संभाव्य कटू प्रसंग टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी आजच आपला थकीत मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने किंवा संबंधित विभागात प्रत्यक्ष जाऊन कर भरणा करावा, असेही प्रशासनाने कळविले आहे.


