तळगावचे मा. बाळकृष्ण दत्ताराम तावडे यांना ‘राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार-२०२६’ जाहीर

0
64
तळगावचे मा. बाळकृष्ण दत्ताराम तावडे यांना ‘राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार-२०२६’ जाहीर
तळगावचे मा. बाळकृष्ण दत्ताराम तावडे यांना ‘राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार-२०२६’ जाहीर

तळगावचे मा. बाळकृष्ण दत्ताराम तावडे यांना ‘राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार-२०२६’ जाहीर

सिंधुदुर्ग — छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणारा ‘राज्यस्तरीय सहकार भूषण पुरस्कार-२०२६’ तळगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते मा. बाळकृष्ण दत्ताराम तावडे यांना जाहीर झाला आहे.
सेवानिवृत्त अधिकारी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, बेलापूर येथे कार्यरत असलेल्या बाळकृष्ण तावडे यांनी सहकार, कामगार कल्याण आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
तावडे यांनी कोविड काळात केलेले सामाजिक कार्य, गरजू व गरीब विद्यार्थ्यांना मदत, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच समाजप्रबोधनाची विविध उपक्रम राबविले आहेत. शासनाच्या विविध योजना व उपक्रम समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
सार्वजनिक जीवनात त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या असून उपाध्यक्ष, आकरी ब्राह्मण सेवा समिती हडपीड (ता. देवगड, सिंधुदुर्ग) तसेच सफेद-अर्क फाऊंडेशन बोर्ड, नवी दिल्ली (रजि.) या संस्थांशी त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
त्यांना यापूर्वीही गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, महाराष्ट्र राज्य समाजभूषण पुरस्कार तसेच इतर अनेक सन्माननीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
शांत, संयमी, सहिष्णू आणि सर्वधर्म समभावाची भूमिका जपत समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
हा पुरस्कार लवकरच मान्यवरांच्या हस्ते कोल्हापूर येथे प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here