तळोजातील डाऊ केमिकलच्या ४० भूमिपुत्र कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी १५ दिवसांत अहवाल सादर करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

0
5
तळोजातील डाऊकेमिकल कंपनीतील ४० भूमिपुत्र कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश
तळोजातील डाऊकेमिकल कंपनीतील ४० भूमिपुत्र कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देशतळोजातील डाऊकेमिकल कंपनीतील ४० भूमिपुत्र कामगारांना सेवेत कायम करण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश

तळोजातील डाऊ केमिकलच्या ४० भूमिपुत्र कामगारांना सेवेत कायम करण्यासाठी १५ दिवसांत अहवाल सादर करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचे निर्देश

तळोजा :
तळोजा येथील डाऊ केमिकल कंपनीत गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ४० स्थानिक भूमिपुत्र कामगारांना सेवेत कायम करण्याच्या प्रश्नावर सकारात्मक दृष्टिकोनातून कार्यवाही करावी, तसेच या कामगारांना न्याय देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित आढावा बैठकीत या कामगारांना सेवेत नियमित करण्याच्या प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला संबंधित अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी आणि कामगार उपस्थित होते.
गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ कंपनीत काम करणाऱ्या स्थानिक भूमिपुत्र कामगारांच्या सेवेत कायम होण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अहवाल निर्धारित कालावधीत सादर करण्याचे निर्देश बनसोडे यांनी दिले. त्यामुळे या कामगारांच्या सेवेत नियमित होण्याच्या मागणीबाबत पुढील कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here