श्रीवर्धनमध्ये संकल्प सेवा अभियानांतर्गत नैसर्गिक भात शेतीशाळा; ३०३ महिलांची शेतकरी प्रमाणपत्र नोंदणी

0
6

श्रीवर्धन :
नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासह शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, या उद्देशाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील कोलमांडले, मारळ आणि मामवली या तीन गावांमध्ये नैसर्गिक भात पीक शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले. संकल्प सेवा अभियान २०२६ अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, रोहा आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी प्रक्षेत्र भेटीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भात पिकाचे व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, गिरीपुष्प हिरवळीचे खत, रब्बी हंगामातील कडधान्य लागवड, शेतीपूरक व्यवसाय आणि विद्यापीठाने विकसित केलेल्या कृषीविषयक ॲप्सची माहिती त्यांनी उपस्थित महिला, शेतकरी आणि युवकांना दिली.
या कार्यक्रमाला पंचायत समिती श्रीवर्धनचे गटविकास अधिकारी राजेश किर्वे, तालुका कृषी अधिकारी लता ढुंबरे, मंडळ कृषी अधिकारी कांचन कदम, माजी सरपंच व प्रशासक श्री. पवार, श्री. पाटील तसेच कृषी विभागाचे श्री. इंगळे आणि श्री. कुंभार उपस्थित होते.
कोलमांडले, मारळ आणि मामवली या गावांमधून अनुक्रमे ४७, ३५ आणि ४९ महिला, शेतकरी व युवकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. तसेच कोलमांडले गावातील एकूण ३०३ महिलांची शेतकरी प्रमाणपत्रासाठी १०० टक्के नोंदणी पूर्ण करण्यात आली. या प्रमाणपत्रांचे प्रायोगिक स्वरूपातील वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमामुळे महिला शेतकऱ्यांची कृषी क्षेत्रातील ओळख अधिक बळकट करण्यास आणि नैसर्गिक शेतीविषयी जागरूकता वाढविण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here