तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ मुंबईत होणार

0
80
तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ मुंबईत होणार
तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ मुंबईत होणार

तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ मुंबईत होणार

मुंबई | क्रीडा प्रतिनिधी

महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने तिसरी महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा येत्या २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी मुंबईत पार पडणार आहे. “लव्ह कॅरम, जय कॅरम!” या घोषवाक्याखाली ही राज्यस्तरीय स्पर्धा खेळवली जाणार आहे.

स्पर्धेचे आयोजन श्री हलरी व्हिसा समाज हॉल, डी.पी. रोड, दादर, मुंबई येथे करण्यात आले आहे. राज्यातील तसेच बाहेरील कॅरमपटूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्ज ११ जानेवारी २०२६ पर्यंत स्वीकारले जाणार असून, इच्छुक खेळाडूंनी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत. असोसिएशनचे कार्यालय पारेख महल, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, शिवाजी पार्क, माहीम, मुंबई – ४०००१६ येथे आहे.

स्पर्धेचे सविस्तर माहितीपत्रक तसेच प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, नियम, अटी व इतर तपशील त्यामध्ये नमूद करण्यात आले आहेत. कॅरमप्रेमी खेळाडूंमध्ये या स्पर्धेबाबत उत्सुकता असून, दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत चुरशीचे सामने रंगणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here