दादरमध्ये मजूर सहकारी संस्थांचे भव्य प्रशिक्षण शिबिर

0
51
दादरमध्ये मजूर सहकारी संस्थांचे भव्य प्रशिक्षण शिबिर
दादरमध्ये मजूर सहकारी संस्थांचे भव्य प्रशिक्षण शिबिर

दादरमध्ये मजूर सहकारी संस्थांचे भव्य प्रशिक्षण शिबिर

 महापौर रितू तावडे यांचे मार्गदर्शन

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई कोकण विभागीय मजूर सहकारी संघ यांच्या वतीने दादर येथील कोहिनूर मंगल कार्यालय येथे सभासद संस्थांसाठी भव्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला मुंबई महापौर रितू तावडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना तावडे म्हणाल्या की, मजूर सहकारी संस्था कष्टकरी वर्गाला एकत्र आणून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. या प्रशिक्षणामुळे सभासदांना नवीन तंत्रज्ञान, कायदेशीर बाबी आणि सहकारी क्षेत्रातील बदलांची माहिती मिळून त्यांच्या कामात पारदर्शकता व गती येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रविण दरेकर, उपमहापौर संजय घाडी, नगरसेवक प्रकाश दरेकर, माजी आमदार रमेश कदम, भाजप उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, नगरसेवक प्रकाश गंगाधरे तसेच आयोजक सुनील बांबूळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून मजूर सहकारी संस्थांना बळकटी मिळून कष्टकरी बांधवांच्या हक्कांचे संरक्षण आणि जीवनमान उंचावण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here