दिघा विभागातील वीज समस्यांबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेची बैठक

0
36
दिघा विभागातील वीज समस्यांबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेची बैठक
दिघा विभागातील वीज समस्यांबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेची बैठक

दिघा विभागातील वीज समस्यांबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत शिवसेनेची बैठक

नवी मुंबई : दिघा विभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध वीज समस्यांबाबत Gauri Kishor Angre यांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. वारंवार होणारी वीज खंडित समस्या, अपुरे मनुष्यबळ आणि वीज पुरवठ्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर यावेळी निवेदन देण्यात आले.

बैठकीदरम्यान दिघा विभागातील नियमित वीज खंडित समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विभागात नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी व कामगारांची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्याची मागणीही करण्यात आली. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ आणि कामगारांची संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

दिघा तलाव डी.पी. येथून मधुर आईस्क्रीम फॅक्टरीपर्यंत वीज पुरवठा देऊ नये, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी महावितरण प्रशासनाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी ज्येष्ठ समाजसेवक किशोर (अन्नू) आंग्रे, शिवसेना शहर प्रमुख समीर पाटील, उपविभाग प्रमुख अविनाश शिंदे, युवासेना विभाग प्रमुख किरण करंदकर, समाजसेवक लॅन्सी ब्रिटो, नामदेव जाधव आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here