दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट

0
57
दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट
दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट

दिलीप वळसे पाटील यांनी घेतली शरद पवारांची सदिच्छा भेट

विविध विषयांवर चर्चा

मुंबई — राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) चे वरिष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओक निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. विशेषतः रयत शिक्षण संस्थेचे कामकाज, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, राज्यातील साखर उद्योगाची सद्यस्थिती तसेच कांद्याच्या बाजारभावासंदर्भातील प्रश्नांवर विचारविनिमय करण्यात आला.
राज्यातील सहकार, शिक्षण आणि कृषी क्षेत्राशी संबंधित विषयांवर झालेल्या या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात या भेटीची चर्चा रंगली आहे. मात्र, ही भेट सदिच्छा स्वरूपाची असल्याचे सांगण्यात येत असून विविध सामाजिक, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर चर्चा करण्यासाठीच ही भेट झाल्याची माहिती मिळाली आहे.
दोन्ही नेत्यांमधील या भेटीमुळे सहकार आणि कृषी क्षेत्राशी संबंधित प्रश्नांवर पुढील काळात सकारात्मक चर्चा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here