दिवंगत अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे २ फेब्रुवारी रोजी सावर्डे येथे दर्शन
महाराष्ट्र राज्याचे उप -मुख्यमंत्री व लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांना घेता यावे, या उद्देशाने राज्यभर अस्थिकलश दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या यात्रेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम सोमवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम आमदार मा. श्री. शेखर निकम यांच्या जनसंपर्क कार्यालयात, सावर्डे येथे होणार आहे.
या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अजितदादांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करता येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व पक्षीय
हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम बाबाजीराव जाधव, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रत्नागिरी जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला असून सकाळी १० वाजता श्रद्धांजली कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.चिपळूण, दि. १ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या अस्थिकलशाचे दर्शन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील नागरिकांना घेता यावे, या उद्देशाने राज्यभर अस्थिकलश दर्शन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.