युनिफाईड कराटे स्पर्धेत शौर्य वनगे ला सुवर्णपदक
चिपळूण l प्रतिनिधी
नगर येथे दि. २३/०१/२०२६ रोजी पार पडलेल्या शालेय विभागीय युनिफाईड कराटे स्पर्धेत चिपळूण तालुक्यातील आकले धामणखोरी- निंबारेवाडी येथील माजी सरपंच कै. बाबाजी महादेव वनगे यांचे नातू शौर्य प्रसाद वनगे याने प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले आहे. या यशामुळे त्याची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शौर्यच्या या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात मोठी संधी उपलब्ध होऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


