दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘कृषी महोत्सव २०२६’ चे आयोजन
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘कृषी महोत्सव २०२६’ चे आयोजन
मुंबई प्रतिनिधी
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ जुलै ते २२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत राज्यभर ‘कृषी महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्रज्ञान, कृषी योजनांची माहिती आणि नाविन्यपूर्ण उपक्रम पोहोचविण्यावर भर देण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध कृषी विषयक कार्यक्रम, शेतकरी मेळावे, पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कृषी महोत्सवात कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, संशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रे आणि संबंधित विभागांच्या सहभागातून शेतकऱ्यांना उत्पादनवाढ, नैसर्गिक शेती, जलसंधारण, पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया आणि बाजारपेठेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवात सहभागी होऊन आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.