दिवा-पनवेल सेक्शनमध्ये पॉवर ब्लॉक; २९ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
दिवा-पनवेल सेक्शनमध्ये पॉवर ब्लॉक; २९ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
कोकण :
कोकण रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत दिवा-पनवेल सेक्शनमध्ये नियोजित पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने २२ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहेत. तसेच काही गाड्यांचे नियमन (रेग्युलेशन) केले जाणार आहे.
दिवा-पनवेल रेल्वे सेक्शनमध्ये पॉवर ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाकडून हे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या नियमित वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीच्या वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे.
पॉवर ब्लॉकमुळे कोणत्या गाड्यांच्या वेळेत किती बदल होणार आहेत, याचा सविस्तर तपशील उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना त्याची माहिती घेता येईल.