दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर होमगार्डना ‘रोबोटिक बोया’चे प्रात्यक्षिक; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नवे तंत्रज्ञान
दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर होमगार्डना ‘रोबोटिक बोया’चे प्रात्यक्षिक; पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नवे तंत्रज्ञान
दिवेआगर :
समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दिवेआगर येथे ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या ‘रोबोटिक बोया’ या आधुनिक बचाव उपकरणाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सर्व होमगार्डना या उपकरणाच्या वापराबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले.
समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी वाढत असताना समुद्रातील संभाव्य दुर्घटना टाळणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरते. अशा वेळी रोबोटिक बोया हे उपकरण उपयुक्त ठरू शकते. या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून होमगार्डना उपकरणाची कार्यपद्धती आणि बचावकार्यातील त्याचा उपयोग समजावून सांगण्यात आला.
या आधुनिक उपकरणामुळे समुद्रकिनाऱ्यावरील सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळ मिळण्यास मदत होणार असून, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.