दि. बा. पाटील यांच्या नावासाठी सुरू असलेल्या उपोषणाला भावनाताई घाणेकर यांचा जाहीर पाठिंबा

0
26

पनवेल
 नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी करंजाडे-पनवेल येथील चिंचपाडा ब्रिज परिसरात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला उरण नगराध्यक्षा भावनाताई घाणेकर यांनी भेट देत जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

यावेळी त्यांनी उपोषणकर्त्या आगरी-कोळी समाजातील कलाकार रश्मिता पोपटा यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच सुरू असलेल्या आंदोलनाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
भावनाताई घाणेकर म्हणाल्या की, एका तरुणीने समाजाच्या अस्मितेसाठी, आपल्या हक्कासाठी आणि लोकनेते दि. बा. पाटील यांना न्याय मिळावा यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आमरण उपोषण सुरू करणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. हा संघर्ष प्रत्येक भूमिपुत्राच्या भावना आणि अस्मितेशी निगडित आहे.
दि. बा. पाटील यांनी आयुष्यभर भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी संघर्ष केला. त्यांच्या नावासाठी आज पुन्हा समाजाला रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. समाजाच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी उभे राहणे ही आपली जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
रश्मिता पोपटा यांच्या त्याग आणि संघर्षाला समाजाचा व्यापक पाठिंबा असून संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here