लोक बिरादरी आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थिनी प्रियंका ओक्साची BSF मध्ये निवड
लोक बिरादरी आश्रमशाळेच्या माजी विद्यार्थिनी प्रियंका ओक्साची BSF मध्ये निवड
डॉ. प्रकाश आमटे यांनी व्यक्त केला अभिमान
हेमलकसा –
गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथील लोक बिरादरी आश्रमशाळेची माजी विद्यार्थिनी प्रियंका ओक्सा हिची सीमा सुरक्षा बल (BSF) मध्ये निवड झाली आहे. ही माहिती ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी दिली.
भामरागड तालुक्यातील मल्लमपोडूर गावची रहिवासी असलेल्या प्रियंकाने आपल्या मेहनत, जिद्द आणि क्रीडा कौशल्याच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. ती देशभर विविध स्पर्धांमध्ये सहभागी झाली असून क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची स्पोर्ट्स कोट्यातून BSF मध्ये निवड झाली आहे.
प्रियंका लवकरच दिल्ली येथे आपल्या सेवेत रुजू होणार असून तिच्या या यशामुळे लोक बिरादरी प्रकल्प, आश्रमशाळा आणि संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.
दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रियंकाचे यश प्रेरणादायी ठरणारे असून कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते, हे तिने सिद्ध करून दाखवले आहे.
प्रियंका ओक्साच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.