दुबईत अडकलेल्या भारतीयांसाठी महाराष्ट्र सरकारकडून व्हॉट्सॲप क्रमांक जारी

0
15

दुबई :

मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबईमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मदत मिळावी यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. दुबईतील इंडियन पीपल्स फोरम यांच्यासोबत समन्वय साधत मदतीसाठी विशेष व्हॉट्सॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे.

ज्यांना कोणत्याही प्रकारची मदत आवश्यक आहे, त्यांनी या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अडचणीत असलेल्या भारतीय नागरिकांना आवश्यक ती माहिती व मदत उपलब्ध करून देण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

मदतीसाठी व्हॉट्सॲप क्रमांक : +97150 365 4357

दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रासह भारतातील नागरिकांना या माध्यमातून तातडीची मदत आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दुबई आणि इतर मध्यपूर्व देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माध्यमांद्वारेच संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here