मुंबई–गोवा महामार्गावर धावत्या कारला आग; चालक गंभीर जखमी

0
37
मुंबई–गोवा महामार्गावर धावत्या कारला आग; चालक गंभीर जखमी
मुंबई–गोवा महामार्गावर धावत्या कारला आग; चालक गंभीर जखमी

मुंबई–गोवा महामार्गावर धावत्या कारला आग; चालक गंभीर जखमी

रत्नागिरी : मुंबई–गोवा महामार्गावर बर्निंग कारचा थरारक प्रकार घडला असून धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना खेड–चिपळूण मार्गावरील भोस्ते घाटाजवळील मोरवंडे गावाच्या हद्दीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, एक वॅगनार कार खेड येथून चिपळूणच्या दिशेने जात असताना मोरवंडे गावाजवळ अचानक कारमधून धूर निघू लागला. काही क्षणांतच कारने पेट घेतल्याने चालक गोंधळून गेला. प्रसंगावधान राखत चालकाने तत्काळ कारमधून उडी मारून बाहेर पडत आपला जीव वाचवला. मात्र, या घटनेत तो गंभीररित्या भाजला आहे.

स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमी चालकाला उपचारासाठी चिपळूण येथील घरडा हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, धावत्या कारला आग लागल्यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूकही विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. संबंधित घटनेची अधिक माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here