देवगड एसटी आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बस चे लोकार्पण

0
26
देवगड एसटी आगारात पाच नव्या 'जिजाऊ' बस चे लोकार्पण
देवगड एसटी आगारात पाच नव्या 'जिजाऊ' बस चे लोकार्पण

देवगड एसटी आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बस चे लोकार्पण

प्रवाशांना सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा – नितेश राणे

देवगड, दि. २८ : देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बसगाड्यांचे लोकार्पण मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

लोकार्पणानंतर उपस्थितांना संबोधित करताना नितेश राणे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) सेवा ही ग्रामीण भागातील जनतेची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे आधुनिक सुविधा असलेल्या नव्या बसगाड्या उपलब्ध करून प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे.
नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी एसटी बससेवेचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन करत त्यांनी एसटी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. प्रवाशांना वेळेवर, विश्वासार्ह आणि गुणवत्तापूर्ण सेवा देण्यावर विशेष भर द्यावा तसेच प्रवाशांच्या अडचणी तत्परतेने सोडवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या कार्यक्रमास माजी आमदार अजित गोगटे, विभाग नियंत्रक दीपक घोडे, संदीप साटम, बाळ खडपे, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, सचिव योगेश चांदोसकर, वैभव करंगुटकर, योगेश पाटकर, दया पाटील, सर्व शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख, नगरसेवक, विषय समिती सभापती, देवगड आगार व्यवस्थापक सौरभ औंधकर, यंत्र अभियंता, चालक पांडुरंग वाघमोडे, स्थानक प्रमुख डोंगरे तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here