देवगड गढीताम्हाणे गावच्या खालचीवाडी येथे गणरायांचे उत्साहात आगमन

0
15
 देवगड गढीताम्हाणे गावच्या खालचीवाडी येथे गणरायांचे उत्साहात आगमन
 देवगड गढीताम्हाणे गावच्या खालचीवाडी येथे गणरायांचे उत्साहात आगमन

 देवगड गढीताम्हाणे गावच्या खालचीवाडी येथे गणरायांचे उत्साहात आगमन

गढीताम्हाणे :
गढीताम्हाणे गावातील खालचीवाडी येथे श्री गणरायांचे भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणरायांच्या आगमनाने खालचीवाडी परिसरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराघरांत गणपतीची पूजा-अर्चा, आरती आणि विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली असून, ग्रामस्थ भक्तिभावाने गणरायाचे स्वागत करत आहेत.
गावातील पारंपरिक गणेशोत्सवाची परंपरा जपत यंदाही खालचीवाडीतील गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात बाप्पांचे स्वागत केले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here