दोडामार्गात डॉ. दिव्या गवस ‘वेदांग क्लिनिक’मध्ये जनरल फिजिशियन म्हणून रुजू
दोडामार्गात डॉ. दिव्या गवस ‘वेदांग क्लिनिक’मध्ये जनरल फिजिशियन म्हणून रुजू
दोडामार्ग : शुभम गवस
दोडामार्ग येथील ‘वेदांग क्लिनिक व सोनोग्राफी सेंटर’मध्ये डॉ. दिव्या गवस या जनरल फिजिशियन म्हणून रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहेत. बी.ए.एम.एस. शिक्षण घेतलेल्या डॉ. गवस यांच्याकडून सर्वसाधारण आजारांची तपासणी व उपचारासाठी नागरिकांना वैद्यकीय सल्ला उपलब्ध होत आहे.
डॉ. दिव्या गवस यांची सेवा मंगळवार ते रविवार सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे दोडामार्ग परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर नियमित वैद्यकीय तपासणी व उपचाराची सुविधा मिळणार आहे.
याच क्लिनिकमध्ये डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे हे स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ म्हणून गुरुवार ते रविवार सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत सेवा देत आहेत. महिलांच्या आरोग्यविषयक तपासणीसाठीही सुविधा उपलब्ध आहे. डॉ. दिव्या गवस यांच्या नव्या वैद्यकीय सेवेसाठी परिसरातील नागरिक व मित्रपरिवाराकडून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.