नमुंमपा आस्थापनेवर ‘गट – ब’ मधील सरळसेवा पदभरती.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील ‘गट ब’ मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेव्दारे भरण्यासाठी, प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी-शर्तींची पूर्तता करणा-या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवेतील आहेत. सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. सदर जाहिरातीनुसार गट ‘ब’ मधील एकूण ०७ पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दि. ०५ जानेवारी २०२६ पासून ते दि. ०४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत आहे.
इच्छुक उमेदवारांनी www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दि. ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी, रात्री ११.५५ वा. पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र हे प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल.
यामधील संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिध्द केली जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्याची पध्दत इ. बाबतचा तपशील जाणून घेण्यासाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नमुंमपा संकेतस्थळाला भेट देण्यात यावी.
तसेच संवर्गनिहाय भरावयाची पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा / वयोमर्यादा शिथिलता, निवड पध्दत, सर्वसाधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाबत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना इ. बाबतचा तपशील www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
याविषयीच्या योग्य माहितीसाठी नमुंमपा संकेतस्थळ तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडिया हँडल्सला भेट द्यावी


