नवी मुंबईच्या महापौरपदी सौ. सुजाता पाटील, उपमहापौरपदी श्री. दशरथ भगत बिनविरोध निवड
नवी मुंबई l प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत सौ. सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी, तर श्री. दशरथ सिताराम भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली. ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रणजित यादव यांनी पीठासन अधिकारी म्हणून या निवडीची घोषणा केली व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा अभिनंदनपर सत्कार केला. सभेच्या सुरुवातीस महापालिका सचिव सौ. संघरत्ना खिल्लारे यांनी पीठासन अधिकारी यांचे स्वागत केले.

महापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जांमधून नगरसेविका सौ. सरोज रोहिदास पाटील यांनी, तर उपमहापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जांमधून नगरसेवक श्री. आकाश बाळकृष्ण मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौरपदी सौ. सुजाता सुरज पाटील व उपमहापौरपदी श्री. दशरथ सिताराम भगत यांची बिनविरोध निवड झाली.
महापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जांमधून नगरसेविका सौ. सरोज रोहिदास पाटील यांनी,निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदाचे स्थानग्रहण केल्यानंतर सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी मनोगत व्यक्त करत सर्व सदस्यांचेआभार मानले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन दोघांचे अभिनंदन केले. तर उपमहापौरपदासाठी दाखल झालेल्या अर्जांमधून नगरसेवक श्री. आकाश बाळकृष्ण मढवी यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महापौरपदी सौ. सुजाता सुरज पाटील व उपमहापौरपदी श्री. दशरथ सिताराम भगत यांची बिनविरोध निवड झाली.
महापौर सौ. सुजाता सुरज पाटील यांनी स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण व वाहतूक नियोजन हे आपल्या कार्यकाळातील प्राधान्यक्रम राहतील, असे स्पष्ट केले. तरुणांना संधी, महिलांची सुरक्षा व सन्मान, ज्येष्ठ नागरिकांचा आदर तसेच सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित सुविधा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहतील, असे त्यांनी सांगितले. गृहिणी ते नगरसेविका, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीनंतर महापौरपदाची संधी मिळणे ही महिलांच्या प्रगतीशील वाटचालीची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद करत नवी मुंबईच्या गतीमान व सर्वांगीण विकासासाठी संवेदनशीलपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
उपमहापौर श्री. दशरथ भगत यांनी नवी मुंबईच्या अधिक गतीमान विकासासाठी उपमहापौरपद ही मोठी जबाबदारी असल्याचे सांगत, ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प व्यक्त केला. नवी मुंबईकरांच्या अपेक्षांना अनुरूप विकासकामे सर्वांना सोबत घेऊन केली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनील पवार, डॉ. राहुल गेठे, विविध विभागप्रमुख, माजी खासदार श्री. संजीव नाईक, माजी आमदार श्री. संदीप नाईक तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
पान ४ वर


