नवी मुंबईत अवघ्या आठ तासांत ११३.२० मिमी पावसाची नोंद; जनजीवन विस्कळीत रस्ते जलमय

0
18
नवी मुंबईत अवघ्या आठ तासांत ११३.२० मिमी पावसाची नोंद; जनजीवन विस्कळीत रस्ते जलमय
नवी मुंबईत अवघ्या आठ तासांत ११३.२० मिमी पावसाची नोंद; जनजीवन विस्कळीत रस्ते जलमय

नवी मुंबईत अवघ्या आठ तासांत ११३.२० मिमी पावसाची नोंद; जनजीवन विस्कळीत

रस्ते जलमय, वाहतूक संथ; महापालिकेची यंत्रणा दिवसभर मदतकार्यात व्यस्त

नवी मुंबई | प्रतिनिधी
शनिवारी नवी मुंबईत सकाळी ८.३० ते सायंकाळी ४.३० या अवघ्या आठ तासांत ११३.२० मिमी पावसाची नोंद झाली. सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला.
ठाणे–बेलापूर मार्ग, शीव–पनवेल महामार्ग तसेच शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मोठ्या प्रमाणात मंदावला. अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी मोठा विलंब सहन करावा लागला.
भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी शुक्रवारीच अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, उद्यान आणि घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते. तसेच सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयात उपलब्ध राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या.
त्या अनुषंगाने विविध विभागांची पथके दिवसभर शहरातील सखल भागांमध्ये पाणी उपसा, निचरा व्यवस्था सुरळीत करणे आणि आपत्कालीन मदतकार्य करण्यात व्यस्त होती.
दरम्यान, महापौर सुजाता पाटील यांनीही शहरातील काही पाणी साचलेल्या भागांची पाहणी करून संबंधित यंत्रणांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here