नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

0
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई, दि. ६ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ परिसरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. महाराजांच्या ३५३ व्या राज्याभिषेक दिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक नेतृत्व, शौर्य आणि देदिप्यमान वारशाला वाहिलेली आदरांजली असून महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक म्हणून उभारण्यात आला आहे.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठ ठाकूर, स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (NMIAL) यांच्या माध्यमातून विकसित करण्यात आलेल्या या स्मारकात ८ फूट उंच चबूतऱ्यावर १२ फूट उंच कांस्य धातूचा अर्धपुतळा (बस्ट) उभारण्यात आला आहे. नवी मुंबईतील **‘आकार आर्ट अँड स्कल्पचर’**चे शिल्पकार नितीन रोहिदास गोर्डे यांनी हा पुतळा साकारला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाने मान्यता दिलेल्या प्रारूपावर आधारित कॉपर अलॉय ब्रॉन्झ (तांबे मिश्रित कांस्य) धातूमध्ये तयार करण्यात आलेली ही कलाकृती पूर्ण होण्यासाठी आठ महिन्यांहून अधिक कालावधी लागला.
विमानतळ परिसरातील हे स्मारक भविष्यात एक प्रमुख आकर्षण ठरणार असून देश-विदेशातील प्रवाशांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणारे प्रेरणास्थान ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here