नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. २५ मे २०२६ पासून १०% पाणी कपात
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. २५ मे २०२६ पासून १०% पाणी कपात
नवी मुंबई :
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राची यावर्षीची व पुढील वर्षाची पाणी पुरवठयाची गरज लक्षात घेता, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आठवडयातून दोन दिवस संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवून पाणी बचत करण्याचे महानगरपालिकेमार्फत नियोजित आहे.
खालील नमूद विभागात आठवड्यातून दोन दिवस संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सदरची १०% पाणी कपात सोमवार, दि. २५ मे २०२६ पासून अंमलात येईल.