नांदुरी-सप्तशृंगी गड मार्ग १० ते २६ सप्टेंबरदरम्यान वाहतुकीसाठी बंद

0
34

रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर; भाविक, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

नाशिक :
नाशिक जिल्ह्यातील नांदुरी ते सप्तशृंगी गड राज्य मार्ग क्रमांक २१ वरील घाट मार्गात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या मार्गावरील वाहतूक काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार १० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत नांदुरी-सप्तशृंगी गड मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे.
या कालावधीत सप्तशृंगी गडावर जाणारे भाविक, वाहनचालक, प्रवासी तसेच स्थानिक नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती कळवण आदिवासी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उ. गो. पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरक्षितपणे पूर्ण करण्यासाठी वाहतूक बंद ठेवण्यात येत असून, नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here