नागपूरचे नामवंत न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराने निधन

0
153
नागपूरचे नामवंत न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराने निधन
नागपूरचे नामवंत न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराने निधन

नागपूरचे नामवंत न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे हृदयविकाराने निधन

नागपूर / प्रतिनिधी :
नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्राला मोठा धक्का देणारी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. शहरातील प्रख्यात न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे आज पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने (Massive MI) निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते.

डॉ. पाखमोडे हे नागपूरसह विदर्भातील वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत आदराने पाहिले जाणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या साध्या स्वभावासाठी, शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी आणि व्यसनमुक्त (Teetotaller) जीवनासाठी ते विशेष ओळखले जात होते. कालच रात्री त्यांची ओळखीच्या व्यक्तींशी भेट झाली होती, त्यामुळे त्यांच्या अचानक निधनाची बातमी अधिकच धक्कादायक आणि हृदयद्रावक ठरली आहे.

पहाटे अचानक प्रकृती खालावल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने डॉक्टरांचे प्रयत्न अपुरे ठरले आणि त्यांना पुन्हा शुद्धीवर आणता आले नाही.

डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांच्या अकाली निधनामुळे नागपूरच्या वैद्यकीय जगतात शोककळा पसरली आहे. अनेक रुग्णांसाठी ते केवळ डॉक्टर नव्हते, तर आशेचा आधार होते. त्यांच्या जाण्याने न्यूरोसर्जरी क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या निधनाबद्दल विविध वैद्यकीय संघटना, सहकारी डॉक्टर, सामाजिक संस्था तसेच नागरिकांकडून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत असून, पाखमोडे कुटुंबीयांप्रती सर्वत्र संवेदना व्यक्त होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here