नागपूर – मडगाव द्विसाप्ताहिक विशेष गाडी आता नियमित एक्सप्रेस म्हणून धावणार
नागपूर – मडगाव द्विसाप्ताहिक विशेष गाडी आता नियमित एक्सप्रेस म्हणून धावणार
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी असून गाडी क्रमांक ०११३९ / ०११४० नागपूर जंक्शन – मडगाव जंक्शन – नागपूर जंक्शन द्विसाप्ताहिक विशेष गाडीचे आता नियमित एक्सप्रेस गाडीत रूपांतर करण्यात आले आहे.
यानुसार ही गाडी आता गाडी क्रमांक ११२०३ / ११२०४ नागपूर जंक्शन – मडगाव जंक्शन – नागपूर जंक्शन द्विसाप्ताहिक एक्सप्रेस म्हणून नियमितपणे धावणार आहे. या निर्णयामुळे विदर्भ, कोकण आणि गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
विशेष गाडीला मिळालेला चांगला प्रतिसाद आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. नियमित एक्सप्रेस सेवा सुरू झाल्याने प्रवाशांना आरक्षण, वेळापत्रक आणि प्रवास नियोजन अधिक सुलभ होणार आहे.