१९ वर्षांखालील विश्वचषक विजेता कर्णधार आयुष म्हात्रेची सदिच्छा भेट
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयाचा नायक ठरलेला कर्णधार Ayush Mhatre याची सदिच्छा भेट घेण्यात आली. जिद्द, मेहनत आणि भारतीय क्रिकेटचा नवा चेहरा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आयुषसोबत विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा रंगल्या.
महाराष्ट्रातील युवा टॅलेंट जेव्हा जागतिक स्तरावर चमकते, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून येतो. आयुषने आपल्या उत्कृष्ट नेतृत्व आणि दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेटमध्ये नवी आशा निर्माण केली आहे.
आयुष, तुझी खेळातील ही लय अशीच कायम राहो आणि भविष्यात टीम इंडियासाठी आणखी मोठी कामगिरी करण्यासाठी तुला भरभरून यश मिळो, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या. आगामी पिढीसाठी तुझा हा प्रेरणादायी प्रवास निश्चितच आदर्श ठरेल.


