विधानपरिषदेच्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी संपन्न
मुंबई : विधानपरिषद सभापती Ram Shinde यांनी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडून आलेल्या सदस्यांना विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ दिली. विधानभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विधानसभा अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर (Rahul Narwekar), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार (Sunetra Ajit Pawar), विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोड (Anna Bansode), महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), पर्यटन मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan), आदी उपस्थित होते.
या शपथविधी सोहळ्यात डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), ओमप्रकाश ऊर्फ बच्चू बाबाराव कडू (Bachchu Kadu), अंबादास एकनाथराव दानवे (Ambadas Danve), डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Pradnya Satav), प्रमोद शांताराम जठार (Pramod Jathar), झीशान झिआउद्दीन सिद्धीकी (Zishan Siddhiki), माधवी संजय नाईक (Madhavi Naik), सुनिल विनायक कर्जतकर(Sunil Karjatkar), विवेक बिपिनदादा कोल्हे (Vivek Kolhe)आणि संजय नथ्थुजी भेंडे (Sanjay Bhende), या १० सदस्यांनी शपथ घेतली.
यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी सर्व नवनिर्वाचित विधानपरिषद सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.


