छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे अभिवादन
मुंबई : धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा
(Jishnu Dev Varma) यांनी मुंबई येथील लोकभवनात महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी लोकभवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहत त्यांच्या शौर्य, पराक्रम आणि स्वराज्यनिष्ठेला अभिवादन केले.


