नालासोपारा मतदारसंघातील BLO यांना विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण

0
21
नालासोपारा मतदारसंघातील BLO यांना विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण
नालासोपारा मतदारसंघातील BLO यांना विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण

नालासोपारा मतदारसंघातील BLO यांना विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे प्रशिक्षण

पालघर
 भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्देशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी १३२-नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी मतदार यादी पुनरीक्षणाचे काम अत्यंत काळजीपूर्वक, अचूक आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना BLO यांना दिल्या.
प्रशिक्षणामध्ये घरभेटीद्वारे मतदारांची माहिती संकलित करणे, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, पात्र मतदारांची नोंदणी करणे तसेच नियमांनुसार आवश्यक दुरुस्त्या व वगळणीची कार्यवाही करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. जाखड यांनी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम हा लोकशाही प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा उपक्रम असल्याचे सांगितले. मतदार यादीची शुद्धता व अद्ययावतपणा सुनिश्चित करण्यासाठी BLO यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून सर्व कामकाज पारदर्शकपणे आणि जबाबदारीने पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
प्रशिक्षणादरम्यान BLO यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच क्षेत्रीय कामकाजात येणाऱ्या अडचणींवर चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षणास संबंधित विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here