नितेश राणेंना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा आणि दंड
सिंधुदुर्ग l प्रतिनिधी : २०१९ मध्ये अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी नितेश राणे यांना न्यायालयाने एक महिन्याच्या कारावासाची तसेच दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणात सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे मोठी चर्चा रंगली होती. न्यायालयाने पुराव्यांचा विचार करून हा निर्णय दिल्याचे समजते.
दरम्यान, या निकालानंतर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे


