निवडणूक संपली, राजकारण संपल आता सर्वांगिण विकास;
आज पासून गुंडाराज बंद : संदेश पारकर
कणकवली
कणकवली शहरात निलेश राणेंच्या एन्ट्रीने शहर भयमुक्त झाले. आ. निलेश राणे यांनी संदेश पारकर यांना निवडून आणण्याचा निर्धार केला होता. मंत्री उदय सामंत यांनी या निवडणूकीत मला मोठी मदत केलेली आहे. माजी आ. राजन तेली, माजी आ. वैभव नाईक, सतीश सावंत, उपनेते संजय आग्रे यांनी मेहनत घेतली. आम्ही शहरविका आघाडी म्हणून जिंकलो आहोत. या शहराच्या विकासाला जो मदत करेल, त्यांच्या सोबत आम्ही आहोत. कणकवली शहर चुकीच्या लोकांच्या हातामध्ये असल्यामुळे त्यांचा विकास झाला नाही. झाला तो 400 कोटींचा भ्रष्टाचार झाला. निवडणूक संपली, राजकारण संपल आता सर्वांगिण विकास केला जाईल. लवकरच नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम राबवण्यात येणार आहे.आता कणकवली भयमुक्त, नगरपंचायतमध्ये सर्वसामान्य येवू शकतात असा विश्वास नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला. कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. माजी आ.राजन तेली, नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, कन्हैया पारकर, जयेश धुमाळे, जाई मुरकर, लुकेश कांबळे, उमेश वाळके, सुदीप कांबळे यांच्यासह शहरविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
संदेश पारकर म्हणाले, कणकवलीकरांमुळे मी पुन्हा नगराध्यक्ष बनलो आहे. या पदाची प्रतिष्ठा राखणं, स्वाभिमान, सन्मान जपणं हेच सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. तो जपण्याचा प्रयत्न मी या निमित्ताने करीन. निवडणूक आणि राजकारण संपलं. जनतेने मला कौल दिला. आता शहरातील सगळी जनता माझी आहे. या जनतेला विश्वासात घेऊन या सत्तेच्या माध्यमातून त्यांची कामे मार्गी लागतील. जनतेचा कसा त्यांचा फायदा, त्या ठिकाणी करता येईल असा प्रामाणिक प्रयत्न माझ्या कामातून करीन. मी येत असताना माझं जल्लोषी स्वागत झालं. माझ्यावर जी जबाबदारी आहे, या येत्या पाच वर्षात माझ्याकडून न्याय मिळू दे आणि चांगलं माझ्या हातातून काम राहू दे. मूलभूत सुविधा रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा, शिक्षण हे जनतेचा हक्क आहे, ते तर आम्ही देणारच आहोत. काहीतरी अशी ठळक कामे, शाश्वत विकासासाठी जी जी उभी राहतील ती केली जातील.
एक जिल्ह्यातील मोठे शहर ज्याला सर्व प्रकारचे महत्त्व आहे. व्यापारी, राजकीय दृष्ट्या, अध्यात्मिक दृष्ट्या, सांस्कृतिक सामाजिक दृष्ट्या शहराला काम साजेसे काम करायचे आहे. शहराची चांगली प्रतिमा कशी निर्माण करता येईल, असा आमचा प्रयत्न राहील. त्यासाठी मला कणकवली वासियांचा सहकार्य लागणार आहे. माझ्या सहकारी नेत्यांनी कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. आज मी नगराध्यक्ष झालेलो आहे. त्यात माझे नगरसेवकच नगराध्यक्ष झाले आहेत, असे मी समजतो. संदेश पारकर हे तुमचं प्रतिनिधित्व करेल व कुठलेही समस्या असते सगळा समस्या या नगराध्यक्ष पदाच्या अधिकारातून मी सोडवीन. या शहराला आर्थिक निधी लागणार आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून योजना नागरिकांना मिळतील. 1999 या शहराचे डीपी झाला. या शहरात 57 ते 58 आरक्षण आहेत, त्यात काही आरक्षणे विकसित झाली. पण उर्वरित आरक्षणे ही संपादित करून विकसित करण्याचा प्रयत्न करण्यासाठी पैसे लागतील. त्यासाठी प्रयत्न करू. या शहरातील ड्रेनेज, पार्किंग, पाणी, रस्ते या प्रश्नांसाठी मी प्रशासनाची चर्चा करेन. इथे येण्यासाठी कोणाला काही अडचण नाही, सहजपणे प्रत्येकाने यावे, आपलं काम त्या ठिकाणी सांगावं आणि त्या कामाला आपण न्याय देऊ. आम्ही जनतेच्या कामासाठी सीसीटीव्ही ठेवणार नाही. फक्त नगरपालिकेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही राहिल, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
नगरपंचायतमध्ये कंत्राटी कामगार जे जे काम करतात, त्यांचे श्रमाचे पैसे मी नक्कीच त्यांना देईन. जे कोणी कॉन्टॅक्ट घेतला आहे , पण जो श्रम करतो त्याला रोजगार मिळाला पाहिजे. तो माझ्याकडून दिला जाईल. कामगारांना जर 16 हजार पगार असेल तर त्यांना दिला जाईल.
ज्यांनी सत्ता उपभोगली त्यांनी कणकवली वासियांना न्याय दिला नाही. ए जी डॉटर्स कचरा व्यवस्थापन प्रकल्प आला होता, 900 कोटींचा हा प्रकल्प असल्याचे सांगून नगरपालिकेची जमीन गहाण ठेवलेली आहे. हा प्रकल्प का आला नाही ? याची तपासणी केली जाईल. खरोखरच जर तो प्रकल्प योग्य असेल. विचार करून निर्णय घेईल. तो न्याय देण्याचा प्रयत्न करेन. जनतेमध्ये दरबार भरून जनतेच्याही सूचना घेऊन व त्यातून विकास करण्याचा प्रयत्न राहील. नगराध्यक्ष आपल्या दारी हा उपक्रम राबवला जाईल. नागरिकांचे काय प्रश्न आहेत. योग्य असलेल्या प्रश्नांना न्याय दिला जाईल. उपनगराध्यक्ष निवडीत नगराध्यक्षाला दोन मतांचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्याकडे 10 मतांचे बहुमत होईल. मला विरोधी पक्षांचेही सहकार्य पाहिजे. मी त्यांच्याशीही चर्चा करेल त्यांचाही चांगल्या कामासाठी पाठिंबा हा नगरपालिकेमध्ये घेईन, असे संदेश पारकर यांनी सांगितले.


