वर्धा – पोलिसांच्या वाहनाला वाघिणीने अर्धा तास थांबवले 

0
147
वर्धा - पोलिसांच्या वाहनाला वाघिणीने अर्धा तास थांबवले 
वर्धा - पोलिसांच्या वाहनाला वाघिणीने अर्धा तास थांबवले 

वर्धा – पोलिसांच्या वाहनाला वाघिणीने अर्धा तास थांबवले 

वर्धा जिल्ह्यातील आष्टी – थार मार्गावर आज थरारक प्रसंग अनुभवास आला. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या वाहनाला वाघिणीने आपल्या पिल्लांसह तब्बल अर्धा तास रोखून धरल्याची घटना घडली असून, याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार राजेश जोशी हे आपल्या सहकाऱ्यासह नियमित गस्तीवर असताना आष्टी–थार मार्गावर त्यांना अचानक वाघिणीचे दर्शन झाले. वाघिणीची पिल्ले रस्त्याच्या एका बाजूला तर वाघीण दुसऱ्या बाजूला असल्याने तिने आपल्या पिल्लांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या वाहनाचा मार्ग रोखून धरल्याचे सांगितले जात आहे.

सुमारे अर्धा तास वाघिणीने रस्त्यावर ठिय्या दिल्यामुळे पोलिसांनी वाहन थांबवून परिस्थिती शांततेने हाताळली. काही वेळानंतर वाघिणीने पिल्लांना सुरक्षितपणे जंगलाच्या दिशेने नेले आणि त्यानंतर पोलिसांचे वाहन पुढे रवाना झाले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या भागातून प्रवास करताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here