मालसाणे येथील णमोकार तीर्थ विकास आराखड्यास ३६.३५ कोटींची मान्यता

0
86
मालसाणे येथील णमोकार तीर्थ विकास आराखड्यास ३६.३५ कोटींची मान्यता
मालसाणे येथील णमोकार तीर्थ विकास आराखड्यास ३६.३५ कोटींची मान्यता

मालसाणे येथील णमोकार तीर्थ विकास आराखड्यास ३६.३५ कोटींची मान्यता

नाशिक l

नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मीयांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रुपयांच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या आराखड्यात २४ कोटी २६ लाख रुपयांची स्थायी स्वरूपातील विकासकामे तसेच ०६ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाच्या आयोजनासाठी १२ कोटी ९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.

विकासकामे दर्जेदार असावीत, कोणतीही तडजोड न करता ती विहित कालावधीत पूर्ण करावीत, तसेच भाविकांना अध्यात्मिक समाधानासह उत्तम सुविधा मिळाव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

या बैठकीस वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल आणि आमदार राहुल आहेर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here