निवृत्ती वेतन न मिळणाऱ्या माजी सैनिक व विधवा पत्नींकडून माहिती सादर करण्याचे आवाहन

0
26

अलिबाग : सैन्यातून सेवा निवृत्त झाल्यानंतरही ज्यांना निवृत्ती वेतन (पेंशन) मिळत नाही, अशा ६५ वर्षांवरील माजी सैनिकांनी तसेच माजी सैनिकांच्या विधवा पत्नींनी आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड–अलिबाग लेफ्टनंट कर्नल राहुल वैजनाथ माने (नि.) यांनी केले आहे.

या अंतर्गत माजी सैनिकांनी सैन्यातून सेवा निवृत्तीचे सर्व संबंधित कागदपत्रे घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड–अलिबाग येथे कार्यालयीन वेळेत सोमवार ते शुक्रवार, दि. २१ जानेवारी २०२६ ते दि. ०४ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सकाळी १०.०० ते सायं. ०६.०० वाजेपर्यंत समक्ष उपस्थित राहून माहिती सादर करावी.

या योजनेसाठी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना वयाची अट लागू नसून, ६५ वर्षांवरील पेंशन न मिळणारे माजी सैनिक पात्र ठरू शकतात. मात्र KSB/ZSB कडून चरितार्थासाठी आर्थिक मदत मिळण्यास अपात्र असलेले, TA बटालियनमधून सेवानिवृत्त परंतु पेंशन नसलेले, सैन्य सेवेतून बडतर्फ (Dismiss) झालेले तसेच अर्धसैनिक बल (Paramilitary Force) मधील माजी कर्मचारी या योजनेस पात्र नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

पात्र माजी सैनिक व विधवा पत्नींनी दिलेल्या कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह माहिती सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here