नीट परीक्षार्थी विद्यार्थिनीला अंबरनाथ पोलिसांची तात्काळ मदत
नीट परीक्षार्थी विद्यार्थिनीला अंबरनाथ पोलिसांची तात्काळ मदत
रविवारी ऑर्डनन्स येथील केंद्रीय विद्यालय येथे NEET परीक्षेच्या बंदोबस्तादरम्यान, परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थिनी आलिशा हिच्याकडे आवश्यक फोटो नसल्यामुळे तिला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळू शकत नव्हता.
तिच्याकडे पैसेही नव्हते आणि कोणतेही नातेवाईक सोबत उपस्थित नव्हते.
विद्यार्थिनीची अडचण लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शब्बीर सय्यद व सहायक पोलीस निरीक्षक श्री. पानसरे यांनी तत्परता दाखवत तिला आर्थिक मदत केली. तसेच अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या सरकारी वाहनातून महिला पोलीस अंमलदारांसह तिला फोटो स्टुडिओमध्ये नेऊन तात्काळ फोटो काढून दिला.
या वेळी केलेल्या त्वरित मदतीमुळे विद्यार्थिनीला वेळेत परीक्षा केंद्रात प्रवेश मिळाला आणि ती NEET परीक्षा देऊ शकली.
अंबरनाथ पोलिसांची संवेदनशीलता, तत्परता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यांचे हे उत्तम उदाहरण आहे.