रेल्वेत ६,५६५ तांत्रिक पदांची मेगाभरती; २९ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
भारतीय रेल्वेकडून विविध नियमभंगांवरील दंडात वाढ; प्रवाशांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २० : भारतीय रेल्वे प्रशासनाने रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि प्रवासीहिताचे करण्याच्या उद्देशाने विविध नियमभंगांवरील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. हे नवीन दंड २० जून २०२६ पासून लागू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना तिकीटासह प्रवास करणे, रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करणे आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. टीटीई (TTE) आणि आरपीएफ (RPF) यांच्या तपासणीदरम्यान सहकार्य करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
१) तिकीटाशिवाय प्रवास करणे – ५००/-
२) दुसऱ्याच्या तिकिटावर प्रवास करणे – ५००/-
३) बेकायदेशीर फेरीवाला – २,०००/-
४) मद्यपान आणि उपद्रव – १,०००/-
५) अपमानास्पद भाषा वापरणे – १,०००/-
६) रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळा आणणे – २,५००/-
७) अनधिकृत प्रवेश – ५००/-
८) वैध तिकिटाशिवाय आरक्षित डब्यातून उतरण्यास नकार देणे – २,०००/-
९) चालक आणि वाहकांचे आज्ञापालन न करणे – ५००/-
१०) पुरुष प्रवाशांनी महिलांच्या डब्यात प्रवास करणे – २,५००/-
११) मालाची खोटी घोषणा करणे – ५००/- प्रति क्विंटल
१२) आक्षेपार्ह वस्तू बाळगणे – १०,०००/-
१३) सार्वजनिक सूचना फलकांची विटंबना करणे – २,०००/-