नेमळे येथे श्रमदानातून वनराई बंधारा; जलसंधारण कामांना गती

0
20
नेमळे येथे श्रमदानातून वनराई बंधारा; जलसंधारण कामांना गती
नेमळे येथे श्रमदानातून वनराई बंधारा; जलसंधारण कामांना गती

नेमळे येथे श्रमदानातून वनराई बंधारा; जलसंधारण कामांना गती

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून जलस्रोत संवर्धनावर भर

सावंतवाडी :
सध्याच्या पाणीटंचाईसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर पाणी अडविणे, पाण्याचे पुनर्भरण करणे आणि उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी नेमळे येथे विविध जलसंधारण कामांना सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर (IAS) यांच्या उपस्थितीत श्रमदानातून उभारण्यात येणाऱ्या वनराई बंधाऱ्याच्या बांधकामाचा तसेच VB-GRAM-G अंतर्गत जलतारा खड्डा कामाचा शुभारंभ करण्यात आला.
पाणीटंचाईसदृश परिस्थितीत गावातील उपलब्ध पाणीसाठ्यांचे संवर्धन आणि भूजल पुनर्भरणाला चालना देण्यासाठी अशा कामांना गती देण्यावर यावेळी भर देण्यात आला. वनराई बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा स्थानिक पातळीवर उपयोग तसेच जलस्रोतांच्या पुनर्भरणास मदत होण्याची अपेक्षा आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर यांनी जलसंधारणाच्या कामांचा आढावा घेतला. गावपातळीवर उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करून लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन करण्यात आले.
पाणी अडविणे, पाणी जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन करण्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्त्वाचा असून, स्थानिक पातळीवरील अशा उपक्रमांमुळे पाणी व्यवस्थापनाला अधिक बळ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here