भालावलमध्ये विविध विकासकामांचा आढावा; दुष्काळसदृश परिस्थितीत उपाययोजनांचे नियोजन
VB-GRAM-G, आवास योजना, जिल्हा वार्षिक योजना आणि अंगणवाडीच्या कामांची पाहणी
सावंतवाडी :
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर करावयाच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी भालावल ग्रामपंचायत कार्यालयास भेट देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या नेतृत्वाखाली मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासुर (IAS) यांनी विविध विकासकामांचा आढावा घेत आवश्यक मार्गदर्शन केले.



